छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अटक चेतन पाटील यांना जामीन मंजूर

मालवण प्रतिनिधी: मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी अटक केलेले आर्किटेक्ट चेतन पाटील यांना उच्च न्यायालयाने आज (दि.२१) जामीन मंजूर केला आहे.

तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन याचिकेवरील निकाल सोमवारी (दि. २५) लागण्याची शक्यता आहे

error: Content is protected !!