पिंगुळी येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मारहाण करणारे ते युवक सांगली येथील

कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी असलेल्या पंकज मसगे याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे दाखल करण्यात आले आहे.

पिंगुळी येथील उमेश गंगावणे आणि पंकज रणशूर हे दोघेजण मयेकर यांच्या दुकानावरून आपल्या घरी जात असताना सर्विस रोडवर तिन्ही इसम रस्त्यावर वेडेवाकडे चालत होते. म्हणून गंगावणे आणि रणशूर यांनी त्यांना रस्त्याने सरळ चाला असं सांगितलं. त्यावेळी त्या तिघांपेक्षा एकाने गंगावणे आणि रणशूर यांना शिवीगाळ केली आणि आपल्या वेलकम हॉटेल जवळ असलेल्या रूममध्ये बोलावलं. गंगावणे आणि रणशूर त्या ठिकाणी गेले असता त्या दोघांनी घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून उमेश गंगावणे आणि पंकज रणशूर यांना मारहाण करायला सुरुवात केली. नंतर उमेश गंगावणे यांनी सागर रणसिंग यांना फोन लावून आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितलं. हे सांगितल्यानंतर वाडीतील अनेक जण त्या रूमच्या शेजारी आले. मात्र दरवाजा काही उघडला गेला नाही. त्या रुमच्या खिडकीच्या काचा फोडून बघण्यात आलं तर मी पंकज रणशूर याला खिडकीच्या फुटलेल्या काचांनी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं. अखेर त्या ठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी दरवाजा फोडून आत गेल्यावर त्यांना ही सर्व घटना दिसली. पंकज मस्के यांच्या डोक्यावर यश ऐनापुरे याने फावडे मारल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि सर्वांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान यश ऐनापुरे याने कुडाळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, रस्त्यावर वाद मिटल्यानंतर आपल्या रूमवर गंगावणे मस्के रणशूर हे आले आणि आम्हाला मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

error: Content is protected !!