मुंबई गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघात

अपआघात ओमनी कारचे मोठे नुकसान

योगिता कानडे / कुडाळ

मुंबई गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे आज पहाटे 5 च्या सुमारास ओमनी कारचा अपघात झाला. या अपघातात ओमनी कारचे मोठे नुकसान झाले. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ निद्रावस्थेत असताना महामार्गावर मोठ्याने आवाज झाला. हा आवाज एवढा भीषण होता की, लोक झोपेतून खडबडून जागे झाले. आवाजाच्या दिशेने जात पाहणी केली असता. ओमनी कारचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले.

महामार्गावर जुनाट झाडाचे वाळलेले लाकूड पडले होते. ओमनीचालक आपल्या ताब्यातील ओमनी घेऊन जात असताना हे लाकूड ओमनीच्या चाकात अडकले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी ही कार तेथील एका दुकानाच्या खांबाला धडकून थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

महामार्गावरील जुनाट झाडांच्या फांद्या नेहमी रस्त्यावर पडून त्या ठिकाणी वारंवार अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. यापूर्वी देखील अशा झाडांच्या फांद्यांमुळे २ दुचाकीस्वारांचा अपघात झाला होता. त्यामुळे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावे. अशी मागणी सध्या वाहनचालकांसह ग्रामस्थांमधून होत आहे.

error: Content is protected !!