भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे

कुडाळ : भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ मंडल युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!