सिंधुदुर्गच्या प्रतिक्षा सराफदारला सुवर्ण पदक

नीरज चोप्रा यांच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकन्या प्रतीक्षा सूर्यकांत सराफदार (कुडाळ) यांनी ३६.४५ मीटर भालाफेकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रतीक्षा सराफदार कुडाळ येथे “राइज एथलेटिक्स अँड फिटनेस क्लब” चालवतात. त्या सैन्य आणि पोलिस विभागातील उमेदवारांना शारीरिक शिक्षण आणि प्रशिक्षण देतात तसेच शाळकरी मुलांनाही प्रशिक्षण देतात. केवळ खेळाडू म्हणून नव्हे तर प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि त्यांचे विद्यार्थी जवळपास सर्व शारीरिक परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत.

या सुवर्णपदकापासून ते स्वतःचे क्लब चालविण्यापर्यंत, त्यांच्या कुटुंबिकांना तिच्या यशावर अभिमान वाटत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!