कलमठ ग्रामपंचायतच्या स्वच्छता जागराला उत्स्फूर्त प्रतिसाद

घरोघरी केला जातोय स्वच्छ कलमठ संकल्प प्रचार

सरपंच संदीप मेस्त्री स्वतः सहभागी

कणकवली : कलमठ गावात स्वच्छता जागराला ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून. पहिल्याच दिवशी नव्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. कलमठ येथे १ ऑगस्ट पासून कचरा संकलन नव्या नियमात होत असून ग्रामपंचायतीची टीम घरोघरी जाऊन कचरा व्यवस्थापन पत्रकांचे वाटप करत आहे.

कलमठ गावातील सामाजिक मंडळे, बचतगट बैठकांनंतर, वाडी, कॉलनीमध्येही बैठका सुरू असून त्यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ग्रामस्थांनी नव्या नियमांचे स्वागत करून सहकार्याची भावना व्यक्त केली. याबाबत सरपंच संदिप मेस्त्री यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

गावात रोज दवंडी दिली जात आहे. शुक्रवारी कचरा संकलनसाठी कलमठ बाजारपेठ येथे सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य अनुप वारंग, सचिन खोचरे, पपू यादव, श्रेयस चिंदरकर, तेजस लोकरे, कर्मचारी गौरव तांबे, समीर कवठणकर, प्रदीप कांबळी, राजू कोरगावकर उपस्थित होते.

error: Content is protected !!