दशावतार रंगभूमीवरील स्त्री कलावंत प्रशांत मेस्त्री यांचे निधन

सिंधुदुर्ग: दशावतार नाट्यकलेमध्ये आपल्या उत्कृष्ट स्त्री भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने दशावतार क्षेत्रातील कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

गेली अनेक वर्षे मेस्त्री यांनी दशावतार रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांच्या अचानक जाण्याने दशावतार कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने एका उत्कृष्ट कलाकाराला आपण मुकलो, अशा भावना दशावतारप्रेमी व्यक्त करत आहेत.

error: Content is protected !!