टँकर मधून डिझेल गळती होत असल्याची स्थानिकांची माहिती
झाराप – पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे टँकरचा अपघात झाला आहे. या अपघातात मळगाव रेडकरवाडीलगत असलेल्या मूर्ती सिमेंट प्लांट नजीक टँकर पलटी झाला आहे.
मुंबई – गोवा महामार्गावर सध्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामुळे वाहनचालकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. आज देखील मळगाव रेडकरवाडीलगत असलेल्या मूर्ती सिमेंट प्लांट नजीक टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून डिझेल गळती होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
या अपघातानंतर बघ्यांनी गर्दी केली होती. तर गाडीचा चालक चालत कुठेतरी निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.