फुलांच्या पाकळ्यांनी खुलला रिगल कॉलेजचा परिसर !

कणकवली : रिगल कॉलेज कणकवली येथे पार पडलेल्या फ्लॉवर पेटल स्पर्धेने संपूर्ण परिसर फुलांच्या सौंदर्याने नटवला. विद्यार्थांनी कल्पकतेचा उच्चांक गाठत फुलांच्या पाकळ्यातून मनमोहक कलाकृती साकारल्या. या स्पर्धेत एकूण १४ गटांनी सहभाग घेतला होता ज्यामध्ये “मदनमंजिरी”, “रातराणी”, “फ्लॉवर क्वीन”, “कुरुक्षेत्र”, “सांजधारा”, “पेटल्स ऑफ पावर्स”, “रायझिंग स्टार” आणि इतर गटांचा सहभाग होता.


कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर मॅड्म आणि परीक्षक श्री.मुकुंद मुद्राळे सर आणि संजय परब यांच्या स्वागताने झाली. त्यानंतर प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर मॅड्म यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर विद्यार्थांनी बनवलेले फुलांचे हार व इतर दागिन्याचे सादरीकरण करण्यात आले. या कालाकृती संपूर्णत: नैसर्गिक फुलापासून साकारलेल्या होत्या. ज्यात सौदर्य, कल्पकता, आणि सांस्कृतिक जाणीव दिसून आली.


स्पर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. ज्यामध्ये तृतीय क्रमांक हा पेटल्स ऑफ पावर (बिसिए द्वितीय वर्ष) आणि द्वितीय क्रमांक हा “कुरुक्षेत्र” (हॉटेल मनेजमेंट तृतीय वर्ष) या संघांनी पटकावला आणि प्रथम क्रमांक हा “द मोगली” (हॉटेल मनेजमेंट तृतीय वर्ष) आणि “रायझिंग स्टार” (बिसिए तृतीय वर्ष) या दोन गटांना विभागून देण्यात आला.


यानंतर प्राचार्या श्रीमती तृप्ती मोंडकर मॅड्म यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करत म्हटले कि, “निसर्गाची जपणूक करत सर्जनशीलतेला दिशा देणारे हे उपक्रम विद्यार्थांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि सौदार्यृष्टी निर्माण करतात.” कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थांना या सर्जनशील आणि रंगीबेरंगी उत्सवाचा मनापासून आनंद घेतला.

error: Content is protected !!