कुडाळ : कुडाळ तालुक्यातील रांगणातुळसुली या गावाला “जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सरपंच नूतन आईर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागेश आईर यांची गावासाठी असलेली तळमळ पाहून आ. निलेश राणे यांनी त्यांची जिल्हा परिषद वेताळ बांबर्डे शिवसेना विभागप्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली.
या कार्यक्रमाला शिवसेना उपनते श्री. संजय आग्रे, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, श्री. संजय पडते, सौ. दिपलक्ष्मी पडते, श्री. दादा साईल, तालुकाप्रमुख दीपक नारकर, सरपंच नूतन आईर, उपसरपंच नागेश आईर, सुरेश झोरे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.