संतोष हिवाळेकर पोईप
श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या
श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण, सिंधुदुर्ग येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तिसरा श्रावण सोमवार निमित्त सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी सामुहिक श्री सत्यनारायण महापूजांच आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक, भक्तांनी* दर्शन, तीर्थ – प्रसाद, आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा
अशी विनंती मठाच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी ७:०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज आणि पादुका पूजन ,सकाळी ८ वा. सामूहिक ” ११ ” श्री सत्यनारायण महापूजा
सकाळी ११ वा. महाआरती
दुपारी १२ वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन
त्यानंतर दुपारी १ वा. अन्नदान-(महाप्रसाद)
दुपारी २:३० वा. सुस्वर भजन-
श्री देव वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ पोईप, यांचे सुस्वर भजन
सायंकाळी ७ :०० वा दैनंदिन-आरती,रात्री ७ : ३० वा. सुस्वर भजन-
आई श्री भराडी देवी भजन मंडळ आंगणेवाडी, मालवण,
रात्रौ ठिक ९ :०० वा. सुस्वर भजन-
श्री देवी भराडी प्रासादिक भजन मंडळ मसदे, मालवण
संपर्क
👆982 17 19 111
👆942 35 38 418
आपला
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास रजि.
संलग्न
श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट
मालवण, सिंधुदुर्ग