वृक्षदिंडी कार्यक्रम जीवन शिक्षण शाळा आरवली नं. १

पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प!

आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग.

कार्यक्रमासाठी वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री. जयवंत राय आणि त्यांच्या समितीने शाळेसाठी ८५ चिकूची रोपे आणि १० पोकळीची झाडे भेट स्वरूपात दिली. या झाडांचे शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. जयवंत राय होते. त्यांच्यासोबत कमिटी सदस्य डॉ. प्रसाद साळगावकर, श्री. आबा टाककर , मयूर आरोलकर, उत्तम चव्हाण, मातोंडकर सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य कुडव मॅडम, कुडव सर आदी मान्यवर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष डॉ.सौ नेहा गावडे मॅडम, उपाध्यक्ष सौ साक्षी शिरोडकर मॅडम, तसेच शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक वर्ग यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती संजीवनी कोकितकर मॅडम यांनी केली. श्री. जयवंत राय यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका श्रीमती वैभवी वसंतराव शिरोडकर मॅडम यांनीही थोडक्यात पण मार्मिक भाषणातून वृक्षदिंडीच्या उद्देशावर प्रकाश टाकला.

शेवटी श्रीमती प्रियदर्शनी म्हाडगूत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली आणि सर्वांना पर्यावरण रक्षणासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या.

“एक झाड, एक जीवन” या विचाराने भारलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणप्रेम आणि सामाजिक भान जागवणारा ठरला.

error: Content is protected !!