कुडाळ : ग्लोबलच्या माध्यमातून आंदुर्ले नं१ या प्रशालेमध्ये संगणक शिबिर संपन्न झाला. जिल्ह्यात संगणक शिक्षण व आरोग्य हे उपक्रम यशस्वीपणे ग्लोबल फाउंडेशन च्या माध्यमातून राबवले जातात . याचाच एक भाग म्हणून आंदूर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदुर्ले नं.१ या शाळेमध्ये दिनांक २४ जून २०२५ पासून संगणक प्रशिक्षण राबवले गेले या प्रशिक्षणाच्या अंतर्गत ३२ मुलांनी सहभाग घेतला यामध्ये संगणकाचे प्राथमिक ज्ञान व हाताळणी इत्यादींची तपशीलवार माहिती प्रशिक्षक श्री नाईक सर यांनी दिली दिनांक ७ जुलै २०२५ रोजी या प्रशिक्षणाची समाप्ती झाली. प्रशिक्षणाच्या समारोपा प्रसंगी ग्लोबलचे श्री लक्ष्मण देसाई ,प्रशिक्षक स्वप्निल नाईक ,सहाय्यक उमेश गावडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व अन्य शिक्षक वर्ग उपस्थित होते यावेळी यावेळी उपस्थित यांचा सत्कार करण्यात आला व मुलांची मनोगते सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोसावी सर यांनी केले तर आभार श्रीमती साईल मॅडम यांनी मांडले. या प्रशिक्षणाला ग्लोबलचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब सर व मुख्याध्यापक तेंडुलकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.