सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे येथे केला सन्मान
वैभववाडी : पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्यावतीने 20 जुलै 2025 रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यातील 300 कर्तुत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका वैभववाडीतील सामाजिक क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ विशाखा नवलराज काळे यांची अहिल्यारत्न या पुरस्कारासाठी निवड झाली होती, विद्येचे माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शाल श्रीफळ मानाचा फेटा सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सन्मान झाला. या पुरस्काराचे आयोजन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मा.प्रवीण काकडे यांनी केले होते. महाराष्ट्रातून 300 कर्तुत्ववान महिलांचा सन्मान झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशाखा काळे यांची निवड झाली होती.
पुणे येथे माहेर असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिदुर्गम भागामध्ये राहून पती नवलराज काळे यांच्या सहकार्याने त्यांच्या सोबतीने त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये काम करत विविध विषयांवर ती सौ काळे यांनी काम केले आहे. बचत गटांच्या माध्यमातून विविध व्यवसाय करत आहे. शहरांमधील जन्म असून गावाकडे सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सौ काळे यांची गावातील युवतींना महिलांना प्रेरणा मिळत आहे अशा प्रकारचे उत्तम कार्य त्यांच्या हातून घडत आहे. शहरामध्ये जन्म होऊन सुद्धा अतिदुर्गम भागामध्ये येऊन आपला संसार व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आपल्या व्यवसायाकडे सुद्धा लक्ष देत चूल आणि मुल त्यापुढे जाऊन सामाजिक राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आपलं नावलौकिक करणाऱ्या सौ काळे यांना हा पुरस्कार मिळाल्या सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र धनगर समाज नेते माजी आमदार रामहरी रुपनवर, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय सचिव गोवा राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष बि डी मोटे, माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड राजू दुर्गे, आयकर आयुक्त पुणे डॉ. नितीन वाघमोडे, संचालक एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन पुणे प्राध्यापक डॉ. महेश थोरवे, चेअरमन श्री सद्गुरु साखर कारखाना बाळासाहेब कर्णवर पाटील, कुबेर फायर इंजीनियरिंग पुणे बाळासाहेब झोरे, रीजन हेड सॅटर्डे क्लब ट्रस्ट पुणे महेश इनामदार, सुनील शेंडगे माधव स्टेज सर्विस पुणे, नथुराम डोईफोडे युवा उद्योजक, बाबुराव शेडगे समाजसेवक मावळ, व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.