सिंधुदुर्ग उबाठा सेनेत फूट ?

माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार उपरकर यांच्या मनमानी कारभाराला विरोध

जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांचे पत्रकार परिषदेत आरोप

कोणत्याही एकतर्फी आंदोलनात संघटनेचा वापर करू देणार नाही

वेंगुर्ले : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गट निर्माण झाल्याचे आज स्पष्ट झाले. वेंगुर्ला येथील एका प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर मनमानी कारभार करत आहेत स्थानिकांना विश्वासात घेत नाहीत. शिवसेना संघटना म्हणून हे प्रकार आम्हाला मान्य नाहीत अशा पद्धतीचा मनमानी कारभार कोणाचाही मतदारसंघात खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट इशारा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेतच दिला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे उभी फूट पडले असल्याचे दिसून आले आहे.


सावंतवाडी मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर यांच्याविरुद्ध बंड पुकारले. वेंगुर्ला येथील प्रकरणात स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेता नाईक आणि उरकत करत असलेले आंदोलन आम्हाला मान्य नाही. सर्वांना विश्वासात घेऊन अशा गोष्टी कराव्यात संघटनेला बाधा होईल अशा गोष्टी होऊ नयेत. असे सांग सांगून आपली नाराजी व्यक्त केली.
वेंगुर्ले येथे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उबादांडा सरपंच निलेश चमनकर, माजी नगरसेवक संदेश निकम माजी नगरसेवक तुषार सापळे दाभोली सरपंच उदय गोवेकर त्यांच्या सह अनेक पदाधिकारी ,महिला पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काही पदाधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही.असा इशाराच देण्यात आला.
काही दिवसापूर्वी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी एका कंपनीच्या व्यवहार प्रकरणात स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भेट घेतली होती. एकंदरीतच या सर्व घटनेनंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आणि या नाराजीतूनच वर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ठाकरे सेनेतच दोन गट निर्माण झाले आहेत.

error: Content is protected !!