संतोष हिवाळेकर / पोईप
नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी चमकले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ताधारक कु. अथर्व विठोबा माधव, कु. अथर्व मंगेश मेस्त्री, कु रोहन राजेंद्र धारपवार, कु. सायली प्रकाश पाताडे, कु. संचिता दिपक मसदेकद कु. चित्रा लक्ष्मण परब या विद्याथ्यानी उत्तुंग यश संपादन करून शाळेच्या प्रगतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशा-बद्दल सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शालेय विभागाकडूनही याची दखल घेऊन अभिनंदन केले.
या बरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही एन्. कुंभार सर, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिलभाई कांदळकर, सर्व संस्थापदाधिकारी, शिक्षक, पालक व दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.