युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन: दानशूर व्यक्तींनी पुढे यावे!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाट येथील २२ वर्षीय कुलदीप सत्यवान नेरुरकर हा गंभीर आजाराने त्रस्त असून सध्या कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुलदीपच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च उचलणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे समाजातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती आणि धर्मदाय संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन त्याच्या कुटुंबियांनी केले आहे.

कुलदीप नेरुरकर या तरुणावर सध्या आवश्यक ते उपचार सुरू असले तरी, पुढील ऑपरेशन आणि संबंधित खर्चाचा भार त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठा आहे. त्यांच्या संघर्षमय आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना या खर्चाची सोय करणे अत्यंत अवघड झाले आहे.

या संकटकाळात कुलदीपला आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी समाजातील संवेदनशील व्यक्ती आणि संस्थांनी आपले मदतीचे हात पुढे करावेत, अशी विनंती कुलदीपच्या कुटुंबियांनी केली आहे. आपल्या थोड्याशा योगदानानेही कुलदीपला नवजीवन मिळू शकते आणि त्याला लवकर बरे होण्यास मदत होईल. मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी कुलदीपच्या कुटुंबियांशी संपर्क साधावा किंवा रुग्णालयाशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!