सिंधुदुर्ग भाजपकडून प्रमोद बांबर्डेकर यांना आर्थिक मदत

कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.

काल दुपारच्या सुमारास वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आज सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने प्रमोद बांबर्डेकर यांच्या घरी भेट देत त्यांना आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत, सुप्रिया वालावलकर, शैलेश बांबर्डेकर, छोटू पारकर, सुनील जाधव, उदय जांभवडेकर, दिनेश जैतापकर, श्री. भोगले, प्रसाद बांबर्डेकर, दशरथ कदम, अरविंद बांबर्डेकर, सोस्मिता बांबर्डेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!