कुडाळ : केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नं. १ येथे डिजिटल बोर्डचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी तथा पांग्रड हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक घोगळे सर आणि विद्यार्थी तन्वीश सावंत यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, उपसरपंच प्रदीप गावडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश घाटकर, नाईक भाऊजी, सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. ठाकूर, शाळा समिती अध्यक्ष सखाराम सावंत, प्रसाद गावडे, घाडी सर, विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
सध्या जग प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा. विद्यार्थांना अभ्यासात रुची निर्माण व्हावी. या हेतूने या डिजिटल बोर्डचे वितरण करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षात शाळेने झपाट्याने प्रगती केली असून विविध उपक्रम शाळेत राबवण्यात आले आहेत. शाळेत राबवल्या गेलेल्या नवीनपूर्ण उपक्रमांमुळे शाळेचे नाव जिल्हाभर चर्चेत आले आहे.