कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे महिलांना व्यवसायासाठी अनुदान

नगरसेविका चांदणी कांबळी यांची माहिती

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील विधवा महिलांसाठी अनुदान देण्यात आले आहे. याबाबतची माहिती नगरसेविका चांदणी कांबळी यांनी दिली आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुडाळ शहरातील विधवा आणि निराधार महिलांना व्यवसायासाठी अनुदान देण्यात आले आहे. सदर अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. यामध्ये ६५ महिलांचा समावेश असून या अनुदानामुळे सदर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत मिळणार आहे. याबाबतची माहिती महिला व बालकल्याण समिती सदस्य तथा नगरसेविका चांदणी कांबळी यांनी दिली आहे.

error: Content is protected !!