कारीवडे,उभागुंडा येथे दोन ट्रकात समोरा समोर धडक; दोन्ही चालक जखमी

सावंतवाडी : कोल्हापूरहून येतअसलेल्या ट्रकचे कारिवडे उभागुंडा या भागात कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या ट्रकाची समोरासमोर धडक घडल्याने मोठा अपघात झाला. यातील सहाचाकी ट्रक मध्ये ड्रायव्हर इब्राहिम बालीगर कर्नाटक चा असून अपघात झाल्याने ट्रक मधील ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकले गेले यामुळे तेथील ग्रामस्थांनी मदत कार्य करून रुग्णवाहिकेने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले चालक दर्शन रवींद्र फोंडेकर राहणार कोल्हापूर चालक शिवाजी विठ्ठल बेडगे कोल्हापूर अशी जखमींचे नावे आहेत.

डॉक्टर प्रशांत जडे तसेच डॉक्टर अपेक्षा कुबल यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले. तसेच सिटीस्कॅन करून योग्य तो औषधोपचार त्यांच्याकडून करण्यात आले. त्यामध्ये एका चालकाच्या नाकाला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांला कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मागणीनुसार पाठवण्यात आले. बाकी सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आपल्या गावी पाठवण्यात आले आहे .यामध्ये डॉक्टर प्रवीण देसाई यांनी योग्य ती तपासणी करून व योग्य तो उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यासाठी रुग्णांना सहकार्य जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *