सिंधुदुर्गात लागलेला तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सावंतवाडी मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात महामार्गावर मुख्यमंत्री उत्तर द्या ! असा सवाल उपस्थित करत लागलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आनंद दिघे यांची हत्या केली होती का?, बाळासाहेब यांनी सोनू निगमला ठार मारण्याचे प्रयत्न केले होते का?, बाळासाहेबांच्या कर्जत येथील फार्म हाऊसवर किती जणांच्या हत्या झाल्या? ऐश्वर्य ठाकरे हा कोणाचा मुलगा आहे? हे प्रश्न विचारणारे बॅनर सिंधुदुर्गात लागल्याने आता वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्व प्रश्नांवर काय बोलणार की या प्रश्नांवर दुर्लक्ष करणार ते पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.