आरोग्य मंत्री आबिटकर यांचे उप-संचालकांना आदेश..!
सावंतवाडी : सावंतवाडी उप -जिल्हा रुंग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’, ‘आय.सी.यु’, ‘रक्तपेढी’, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदी समस्या तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य उप-संचालक डॉ. दिलीप माने यांना दिले.
सावंतवाडी उप – जिल्हा रुग्णालय कृती समितीचे निमंत्रक रविंद्र ओगले, माडखोलचे माजी सरपंच संजय लाड,रविंद्र केरकर, अभिनव फाऊंडेशन, सिंधुदुर्ग चे प्रथमेश मुरगोड, सामाजिक कार्यकर्ते ऍड. नंदन वेंगुर्लेकर,संपत दळवी आदींच्या शिष्टमंडळाने आबिटकर यांची आज त्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानी भेट घेतली.
अभिनव फाऊंडेशनने सावंतवाडी उप- जिल्हा रुग्णालय प्रश्नी दाखल केलेली जनहित याचिका, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,इथल्या दुरावस्थेमुळे, गोवा-बांबुळी येथे पाठवले जाणारे पेशंट, रखडलेले मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल यासंदर्भात निमंत्रक ओगले यांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.कृती समितीच्या वतीने आबिटकर यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
सावंतवाडीत उप -जिल्हा रुग्णालयाच्या प्रश्ना संदर्भात येत्या 26 जानेवारीला उप -जिल्हा रुग्णालया समोर लाक्षणिक उपोषणाचा इशाराही समितीने दिला आहे.


Subscribe









