सावंतवाडी पालिकेच्या आपला दवाखाना इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळला

भाजप नगरसेवकांकडुन पाहणीःसुरक्षीतता लक्षात घेता दवाखाना अन्यत्र हलविण्याच्या सुचना

सावंतवाडी : सालईवाडा येथे असलेल्या पालिकेच्या आपला दवाखान्याचे स्लॅब कोसळले आहे याबाबतची माहीती मिळताच भाजपाचे नगरसेवक प्रतिक बांदेकर आणी निलम नाईक यांनी त्या ठीकाणी तात्काळ धाव घेत पाहणी केली.

दरम्यान दवाखाना सुरू असलेली इमारत जीर्ण झाली आहे त्यामुळे त्या ठीकाणी येणार्‍या रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेता तो दवाखाना तात्काळ अन्यत्र हलविण्यात यावा अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

येथिल मिलाग्रीस चर्च समोर असलेल्या जुन्या मुख्याधिकारी निवासस्थानात हा आपला दवाखाना सुरू आहे त्याठीकाणी दिवसाला पन्नासहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात त्या ठीकाणी चांगली सेवा मिळत असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे.दरम्यान हा दवाखान्यात असलेल्या जनरल वॉर्डचे स्लॅबचा मोठा भाग कोसळला आहे सुदैवाने त्या ठीकाणी कोणीही नसल्यामुळे कोणतीही जिवीनहानी झालेली नाही.


दरम्यान याबाबतची माहीती मिळाल्यानंतर श्री बांदेकर आणी सौ नाईक या दोघांची पालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी संदिप सरडे आणी मनोज राउळ यांना घेवून त्या ठीकाणी पाहणी केली तसेच त्या ठीकाणी असलेले वैदयकीय अधिकारी हर्ष सांगावकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी रुग्णांची सुरक्षितता लक्षात घेता तो दवाखाना सुरक्षीत जागेत तात्काळ हलविण्यात यावा त्यासाठी रुग्णांना सोईचे व्हावे यासाठी पालिकेच्या जेष्ठ नागरीक केद्राच्या इमारतीचा विचार व्हावा अशा सुचना दोघांनी पालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

error: Content is protected !!