जागतिक रक्तदाता दिवस निमित्ताने प्रकाश मारुती नागोळकर यांचा सत्कार


तब्बल वीस वेळा रक्तदान केल्याबद्दल आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने प्रकाश मारुती नागोळकर यांचा विशेष सत्कार…


कुडाळ : तालुक्यातील आंदुर्ले विभागातील आवेरे गावचे प्रकाश मारुती नागोळकर.यांनी चार ते पाच महिन्यात तब्बल वीस वेळा रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन रक्तदान आता पर्यंत केले.
समाजकार्यात कायम अग्रेसर आणि आरोग्य क्षेत्राची आवड असणारे, वेळ प्रसंगी मदतीला धावून येणारे व्यक्तीमहत्व अशी त्याची ओळख.


आज जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी प्रकाश मारुती नागोळकर याच्या उपक्रमाचा आंदुर्ले ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला.


यावेळी प्रकाश नागोळलकर म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठ दान.जेव्हा रक्तदान शिबीरे राबवली जातात तेव्हा रक्तदान करण्यासाठी युवा पिढीने न घाबरता रक्तदान जास्तीत जास्त करण्यात पुढाकार घ्यावा.यापुढे हि माझा उपक्रम सुरु ठेवणार. त्यांच्या या जिद्दी आणि चिकाटी उपक्रमचा प्रकाश नागोळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव आंदुर्ले विभागात केला जात आहे.

error: Content is protected !!