राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले आहे. तर त्या ठिकाणची जमीन खोलवर खचल्याचे दिसत आहे. पुतळा भक्कम असून जमीन खचल्यामुळे बांधकाम निकृष्ट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!