Category महाराष्ट्र

फोंडाघाट येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांचा होणार प्रतिष्ठान च्या वतीने नागरी सत्कार शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाटचे आयोजन फोंडाघाट: शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट मध्ये सलग ८ व्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव फोंडाघाट…

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफार्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

सिंधुदुर्ग : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला असुन आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफार्मरची मागणी केली होती…

नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश

आयएनएस गुलदार ह युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार सिंधुदुर्ग : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.…

शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, हिर्लोक संचलित शिवाजी विद्यालय हिर्लोकचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कुडाळच्या…

ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा संजय पडते यांचा राजीनामा

नेमके शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये ? कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पडते आता भाजपकडे जाणार की शिवसेनेत ? हे पाहणं आता महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरलं…

रुग्णाला सावंतवाडीतून बांबुळीत घेवून जाणारी १०८ रुग्णवाहिका वाटेतच पेटली…

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेवून जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला.…

नांदगाव मोरये वाडी येथील सामाईक बंद घराला लागली आग

कणकवली : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात…

गावारेड्याच्या धडकेत पादचारी गंभीर

सावंतवाडी : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्याकळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

सावंतवाडी येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : ओटवणे-जाधववाडी येथील अक्षय गुंडू जाधव (वय २८) या युवकाने आपल्या घराच्या पडवीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

error: Content is protected !!