संतोष हिवाळेकर/ पोईप
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागातील शिवसैनिकांच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठीवडे या प्रशालेत मुलांना खाऊ वाटप व हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी विभाग प्रमुख बंडू चव्हाण सुभाष धुरी, सरपंच सौ दिव्या धुरी,उपसरपंच स्वप्निल पुजारे,पक्षाचे महिला विभाग प्रमुख सानिका कुमामेकर किशोर पाताडे आकाश राठोड, कृष्णा पुजारे,संजय परब, युवासेना शाखाप्रमुख शुभम परब, अक्षय परब, अमोल लाड, नारायण जाधव, उपविभागप्रमुख अमित फोंडके,प्रविण परब,व आडवली माडली विभागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Subscribe










