चौकूळ येथील जंगलात शिकार करणाऱ्या चार आरोपीना पडकडले

सावंतवाडी : आंबोली (चौकूळ) केगदवाडी येथे जंगलात शिकारीला गेलेले चार इसमांचे वनखात्याच्या रात्रीच्या गस्त घालणारे वनरक्षक याने पकडले त्यांच्याकडून चार ते पाच जिवंत काडतूसे दोन मोबाईल, शिकार केलेला जंगली ससा असे सामग्री शिकार करणाऱ्यांकडू हस्तगत केले. त्यांच्याकडे असलेले चार दुचाकी वाहने पण वन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून आंबोलीच्या परिक्षेत्र अधिकारी प्रमिला शिंदे यांच्या याने त्यांच्यावर वनयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी प्रशांत सदानंद कुबल राहणार कुडाळ, अमोल नामदेव गावडे रा. खासकीलवाडीं चौकुळ, दशरथ बाबुराव राऊळ, राहणार माडखोल, सखाराम रामचंद्र राऊळ राहणार माडखोल, अशी आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई रेंजर प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी वनविभागचे वनरक्षक बदाम राठोड, संकेत पाटील, चौकुळ वनपाल नामदेव चौगुले, आंबोली वनपाल सम्राट पाटील, देवसू वनपाल महबूब नाईकवाडी, वासुदेव खोत उपस्थितीत होते.

error: Content is protected !!