Category News

ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा संजय पडते यांचा राजीनामा

नेमके शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये ? कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पडते आता भाजपकडे जाणार की शिवसेनेत ? हे पाहणं आता महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरलं…

रुग्णाला सावंतवाडीतून बांबुळीत घेवून जाणारी १०८ रुग्णवाहिका वाटेतच पेटली…

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा-बांबुळी येथे रुग्णाला घेवून जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेने वाटेतच पेट घेतला. यात रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री एक वाजण्याच्या सुमारास कोलवाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली. गाडीत पुढे बसलेल्या डॉक्टरांना गाडीतून धूर येताना दिसला.…

नांदगाव मोरये वाडी येथील सामाईक बंद घराला लागली आग

कणकवली : नांदगाव मोरये वाडी येथील मनोहर आत्माराम बिडये व पुजा देवेंद्र बिडये यांच्या सामाईक बंद घराला रात्री ८:३० सुमारास अचानक आग लागली.या आगीत पुर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले.सुमारे एक तासानंतर दाखल झालेल्या अग्निशामक बंबालाही ही आग आटोक्यात…

गावारेड्याच्या धडकेत पादचारी गंभीर

सावंतवाडी : चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गव्याच्याकळपाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज साडे सात वाजता नेमळे-बिसोळे येथे घडली. सोनू मधुकर राऊळ (वय ३८) असे त्यांचे नाव आहे. त्यांना अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

सावंतवाडी येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…

सावंतवाडी : ओटवणे-जाधववाडी येथील अक्षय गुंडू जाधव (वय २८) या युवकाने आपल्या घराच्या पडवीतच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडे नऊच्या सुमारास उघडकीस आली. घरात कोणी नसताना त्याने हा प्रकार केला. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.…

पत्रकार बाळ खडपकर यांना मातृशोक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ( वय ८७ ) यांचे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते. प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात…

सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे येथे ओहळावर बंधारा बांधण्याचा उपक्रम

कुडाळ : पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तेरसे बांबर्डे शेणईवाडी येथे श्री निलेश शेणई यांच्या घराजवळील ओहळावर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याचा उपक्रम सिंधू संघर्ष युवा संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आला. सिंधू…

चिपी विमानतळाच्या श्रेयासाठी भांडणारे विमानतळ बंद पडून तिन महिने होत आले तरी आता गप्प का ?

विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले यासाठीच भांडत असतात. परंतु आता चिपी विमानतळ बंद…

नगरसेवक उदय मांजरेकर यांची गोट्या चव्हाण यांना धमकी

कुडाळ पोलीसात तक्रार दाखल कुडाळ : व्हॉट्सॲपवर धमकी दिल्याप्रकरणी कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्यावर कुडाळ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअँपवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून नगरसेवक उदय…

error: Content is protected !!