आनंद शिरवलकर यांच्या हस्ते श्रावणी सोमवार निमित्त श्री देव कुणकेश्वर चरणी पूजा संपन्न

देवगड : श्री. देव कुणकेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री देव कुणकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त प्रत्येक सोमवारी पूजा संपन्न होणार आहे. यावर्षीची पहिली पूजा आज २८ जुलै रोजी संपन्न झाली. या पूजेचा पहिला मान उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला. यावेळी त्यांनी श्री देव कुणकेश्वर मंदिरात सपत्नीक पूजा केली. यावेळी कुडाळ नगरपंच्यायातच्या नगरसेविका चांदणी कांबळी, युवा सेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, तालुका सचिव साईराज दळवी, लवू कदम आदी उपस्थित होते. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीकडून श्री. आनंद शिरवलकर व सौ. प्राजक्ता शिरवलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!