कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पणदूर हायस्कुल सभागृह, पणदूर तिठा, कुडाळ मुंबई गोवा हाईवे येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निशुल्क असून श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,सीमाशुल्क विभाग मुंबई, भारत सरकार)…
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे एकाचा बळी कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पणदूर गावातील हातेरी नदीवरील पूल गेल्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेल्याने, येथील नागरिकांना अक्षरशः जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. एका वर्षाहून अधिक काळ उलटला तरी प्रशासनाने नवीन पूल बांधण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोमवारी वेंगुर्ले सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये देणार धडक
कुडाळ : NAMSTE दिनानिमित्त आज कुडाळ नगरपंचायतमार्फत शहरातील सेप्टिक टँक क्लिअरिंग वर्कर्स यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नयना मांजरेकर उपस्थित होते. हा उपक्रम कामगारांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून…
देवगड येथील चिरेखाणीत घडली घटना; संशयित अटकेत देवगड : देवगड तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, एका परप्रांतीय कामगाराने सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्यासारख्या किरकोळ कारणावरून आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या ‘टॉमी’ने (मोठा लोखंडी गज) प्रहार करून त्याची निर्घृण…
सोनाली गावडे मृत्यू प्रकरण इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज आठ दिवस पूर्ण झाले तरी सिंधुदुर्ग पोलिसांना अद्याप मुख्य संशयितास पकडण्यास यश आले नाही. या घटनेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळणारा तो युवक स्थानिक…
गटनेते मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : नगरपंचायतीच्या महाविकास आघाडीतील सात नगरसेवकांनी भाजप पक्षात प्रवेश केला या सात नगरसेवकांनी स्वेच्छेने महाविकास आघाडीचा गट सोडला त्यामुळे महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी या सात नगरसेवकांना अनहर्ता कायद्यानुसार अपात्र करावे अशी…
संतोष हिवाळेकर / पोईप शनिवार दिनांक 12 जुलै २०२५ रोजी श्री. आबा चव्हाण यांचे घरी शिसेगाळुवाडी, गोळवण येथे श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोळवण गावचे सन्माननीय सरपंच श्री सुभाष द. लाड साहेब, उपसरपंच…
देवगड तालुक्यातील घटना नाडण वरची पुजारेवाडी येथील उमेश सत्यवान पुजारे (३४) यांनी मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी घरी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. १४ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते परंतु उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे १५ जुलै रोजी…