सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तो युवक मंदिरात पूजेसाठी जाणारा

सोनाली गावडे मृत्यू प्रकरण

इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज आठ दिवस पूर्ण झाले तरी सिंधुदुर्ग पोलिसांना अद्याप मुख्य संशयितास पकडण्यास यश आले नाही. या घटनेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळणारा तो युवक स्थानिक असल्याचे उघड झाले असुन तो दररोजप्रमाणे मंदिरातील पुजा करण्यासाठी गेला होता. तर पुजा आटोपून अर्ध्या तासाने तो परत माघारी आला. त्याची बांदा पोलिसांनी चौकशी केली असुन जाताना किंवा येताना मयत सोनाली आपल्याला दिसली नाही अशी माहिती त्याने बांदा पोलिसांना दिली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही आढळून आलेला युवक कोण हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलिसांना त्या युवतीचा घातपात करणाऱ्या पर्यत पोहचण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. इन्सुली कोठावळेबांध येथील युवती सोनाली प्रभाकर गावडे ही युवती मंगळवारी नेहमी प्रमाणे कामासाठी निघाली. ती साऊथ कोकण डिस्टलरिज येथे गेली काही वर्षे कामाला जात होती. घरातून निघाल्यावर ती कंपनीच्या गाडीने ये जा करत होती. मात्र मंगळवारी ती कामाला गेली नाही. सायंकाळी घरी न परतल्याने तिचा शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही. सकाळी तिचा मृतदेह दोन फुट पाण्यात आढळून आला. त्यामुळे तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला. आज आठ दिवस उलटले तरी या प्रकरणाचा तपास करण्यास सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे. ती ज्या वेळेत कामाला जाते दरम्यान च्या वेळेत जाणारा एक युवक सिसिटीव्ही फुटेज मध्ये आढळून आला होता. मात्र सदर फुटेज स्पष्ट नसल्याने तो युवक कोण हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे काल पोलिसांनी आजूबाजूच्या् सीसीटीव्ही फुटेज घेत तो युवक कोण याचा तपास पूर्ण केला आहे. सदरचा युवक मयत सोनाली यांचा शेजारी असुन नेहमीप्रमाणे तो पुजा करण्यासाठी मंदिरात जात होता. तो जाताना आणि अर्ध्या येताना फुटेज मध्ये दिसत असुन बांदा पोलिसांनी त्याची चौकशी केली. सायंकाळी उशिरा त्याला बांदा येथे बोलविले असुन त्याचा जबाब घेण्याचे काम करत होते. दरम्यान त्याने आपल्याला ती युवती जाताना किंवा येताना दिसलीच नाही असे पोलिसांना स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिसिटीव्ही मध्ये असणारा युवक समोर आल्याने पोलिसांना आता तपास करण्याचे वेगळे आव्हान उभे राहिले आहे. आज दिवसभर बांदा पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग परिसरात ठाण मांडून होते. या प्रकरणाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर असल्याने पोलीस कसून तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज सुद्धा तपासकामी आले होते. मात्र नेमका कोणता तपास केला याची माहिती मिळाली नाही.

error: Content is protected !!