श्री भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल – डॉ.पालसांडे

संतोष हिवाळेकर / पोईप

शनिवार दिनांक 12 जुलै २०२५ रोजी श्री. आबा चव्हाण यांचे घरी शिसेगाळुवाडी, गोळवण येथे श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोळवण गावचे सन्माननीय सरपंच श्री सुभाष द. लाड साहेब, उपसरपंच श्री शरद रा. मांजरेकर, सहा. प्राध्यापक मुळदे डॉ. विजय पालसांडे , कट्टा गावचे प्रगतशील शेतकरी श्री. आनंद रावले, उपकृषि अधिकारी कट्टा श्री. डी के सावंत, ग्रा. पं.सदस्य श्रीम. प्राजक्ता चिरमुले, पीक विमा समन्वयक श्री. माईणकर, प्रकल्प सहयोगी श्री आशिष जाधव, कृषी सेवक श्री नितेश पाताडे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व गोळवण कुमामे डिकवल येथील 100 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करत असताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पालसांडे सर यांनी GOI UNDP GCF ECRICC अंतर्गत श्री भात पीक लागवडीबद्दल तांत्रिक मार्गदर्शन करताना श्री पद्धतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतकरी संपन्न होईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले श्री आनंद रावले यांनी स्वअनुभवातून करत असलेल्या श्री भात पीक पद्धतीचे फायदे उपस्थितांना सांगितले. सदरील कार्यक्रमाला गोळवण कुमामे डिकवल मधील प्रगतशील शेतकरी सत्यविजय पालव, नंदादीप नाईक, नामदेव परब, नामदेव चव्हाण, नारायण परब, सुहास घाडी, दिपश्री आंगचेकर, सागरिका लाड, उत्तम पाताडे, संतोष चव्हाण, मिलिंद लोहार, गुरुनाथ पालव, मनोहर परब दिवाकर परुळेकर इत्यादी शेतकऱ्यांनी उस्पुर्त प्रतिसाद नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.UNDP GCF ECRICC कार्यक्रमांतर्गत SRI भात पीक प्रशिक्षण कार्यक्रमाचे मनोगत व आभाप्रदर्शन सरपंच श्री सुभाष लाड साहेब यांनी केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सेवक श्री नितेश पाताडे यांनी केले.

error: Content is protected !!