कुडाळ : NAMSTE दिनानिमित्त आज कुडाळ नगरपंचायतमार्फत शहरातील सेप्टिक टँक क्लिअरिंग वर्कर्स यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद नातू, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, नगरसेविका नयना मांजरेकर उपस्थित होते.
हा उपक्रम कामगारांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे.