Category सिंधुदुर्ग

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग…

चार चाकी वाहन नाही तरीही लाडक्या बहिणींना पैसे मिळणे बंद

ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला. सत्ता आल्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र त्यानंतर सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याच्या चर्चांना उधाण आले. अशातच लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार ज्या लाडक्या…

वेंगुर्ला येथे भव्य बहुप्रजातीय मत्स्य बीज उत्पादन केंद्र उभारणीला शासनाची मंजुरी

मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रयत्नाला यश प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मौजे – वाघेश्वर (उभादांडा) येथे तब्बल रु. २२ कोटी २३…

माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेना पिंगुळी विभागाच्या वतीने आनंदाश्रय अणाव येथे धान्य वाटप

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रय आश्रम येथे भेट घेऊन.पिंगुळी उबाठा शिवसेना विभागाच्या वतीने आनंदाश्रय आश्रम अणाव संचालक मा.बबन परब आणि विद्या वारंग मॅडम यांच्या कडे वाढदिवसानिमित्त निराधार व्यक्तींना गोड जिलेबी तसेंच बिस्कीट पुढे, जीवनावश्यक वस्तू व…

खड्डा चुकवताना एस. टी. दगडावर आदळून दर्शनी भागाचा चक्काचूर

वैभववाडी : खड्डा चुकवताना एसटी दगडावर धडकली एसटीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, वैभववाडी गणपती विसर्जन घाटाजवळ पहाटे ४ वा धाराशिव -पणजी गाडीला अपघात झाला ह्यात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही राष्ट्रीय महामार्गावरील एडगाव इनामदारवाडी येथील पुलाचे काम सुरू आहे त्यामुळे…

चौकूळ येथील जंगलात शिकार करणाऱ्या चार आरोपीना पडकडले

सावंतवाडी : आंबोली (चौकूळ) केगदवाडी येथे जंगलात शिकारीला गेलेले चार इसमांचे वनखात्याच्या रात्रीच्या गस्त घालणारे वनरक्षक याने पकडले त्यांच्याकडून चार ते पाच जिवंत काडतूसे दोन मोबाईल, शिकार केलेला जंगली ससा असे सामग्री शिकार करणाऱ्यांकडू हस्तगत केले. त्यांच्याकडे असलेले चार दुचाकी…

मालवण बसस्थानकात इमारतीचा स्लॅब कोसळून महिला जखमी..

मालवण : बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन…

पालकमंत्री नितेश राणे २७ मार्च रोजी ओरोस येथे घेणार “जनता दरबार”

ओरोस येथील पालकमंत्री संपर्क कार्यालयात होणार जनता दरबार सिंधुदुर्ग : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार २७ मार्च रोजी ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारती मधील पालकमंत्री संपर्क कार्यालयात जनता दरबार घेणार…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी व रुग्णांना फळांचे वाटप

संतोष हिवाळेकर/ पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागातील शिवसैनिकांच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठीवडे या प्रशालेत मुलांना खाऊ वाटप व हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात…

कणकवलीत दोन तरुणांमध्ये हाणामारी ; एकावर गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली शहरातील पटकीदेवी येथे मच्छी मार्केटजवळ दोन तरुणांमध्ये क्षुल्लक कारणातून शाब्दिक बाचाबाची होऊन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अमित पेडणेकर (३२, रा. पटकीदेवी मंदिराजवळ, कणकवली) याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे…

error: Content is protected !!