Category बातम्या

अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसाठी मंत्री नितेश राणेंची जलसंधारण मंत्र्यांशी बैठक

अरुणा मध्यम प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबई दि. १० : वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्प ग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आज…

शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल

८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा सहसंचालकांकडे समस्या सोडविण्याची केली मागणी

अस्वलाचा हल्ल्यात एक गंभीर

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली-फणसवाडी येथे अस्वलाने हल्ला केल्याने विष्णू लाडू गवस हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू गवस हे वटपौर्णिमेनिमित्त फणस काढण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते…

कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे कामना गेल्या सोळा वर्षांची परंपरा कुडाळ : गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गावलदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी…

कणकवलीत आठवडा बाजारादिवशी एका जोडप्याकडून दोघांच्या पर्स लंपास

महिलेच्या मुलीने सतर्कता दाखवत पर्स घेतली काढून कणकवली : मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी 11.30 वा. दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलाखी करत दोघांच्या पर्स मधील पैसे लंपास केले. मात्र यातील पर्स मधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या…

आ. निलेश राणेंची कार्यतत्परता

पोईप – विरण येथील पुलाच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी व तत्काळ शुभारंभ मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे म्हणजे झटपट निर्णय हा अनुभव मागील पाच ते सहा महिन्यांपासून सातत्याने येत आहे. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा दिसून आला. मालवण…

कणकवली डीपी रोड नजीकच्या गटाराच्या चेंबरमध्ये पडलेल्या बैलाला जीवदान

माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नागरिकांनी घेतली धाव कणकवली : शहरात डीपी रोड नजीक असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बैल पडल्याची घटना घडली. ही घटना समजतात माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या ही बाब तेथील काहींनी निदर्शनास आणली.…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचे आयोजन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.मराठा समाज हॉल कुडाळ याठिकाणी दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता…

अखेर कुडाळ एसटी आगारात नव्या ५ बसेस दाखल

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश कुडाळ : एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या. सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या. मात्र, आज कुडाळ आगारात…

परत बोललात तर उलट्या करायला लावेन

नारायण राणेंनी भरला सज्जड दम मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नुकतीच नीलेश राणे, नीतेश राणे आणि नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय?…

error: Content is protected !!