राजर्षी छ. शाहू महाराज जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव

चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण चा उपक्रम

संतोष हिवाळेकर / पोईप


सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.


ओम साई मंगल कार्यालय (मामा माडये) कट्टा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून महाराष्ट्र राज्य दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर,प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव,प्रमुख मार्गदर्शक विजय चव्हाण,ऍड.अनिल निरवडेकर,मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, प्रमुख वक्ते प्रसाद मसुरकर,जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव,जिल्हा उपाध्यक्ष उत्तम चव्हाण,संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष संजय कदम,माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगांवकर,माजी सभापती अजिंक्य पाताडे,तालुका उपाध्यक्ष रमेश चव्हाण,वेंगुर्ला अध्यक्ष सहदेव शिरोडकर,कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सदस्य आनंद जाधव,मंगेश आरेकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाताडे,वसंत चव्हाण,श्रीकृष्ण पाडगांवकर,पंडित माने,सुरेश चौकेकर ,सूर्यकांत चव्हाण,माजी तालुकाध्यक्ष सुनील पाताडे,विजय चौकेकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमात दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, एन. एम. एम.एस.तसेच बीए. बी.कॉम. बी.एस.सी., इंजिनिअरिंग, डॉक्टर्स, वकील पदवी परीक्षा उत्तीर्ण यांचा तसेच समाजातील सेवानिवृत्त व प्रमोशन मिळालेल्या बांधवांचा, ज्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत अशा सर्व समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात बोलताना विजय चव्हाण यानी समाजातील विद्यार्थ्यांनी ही कौतुकाची थाप घेऊन मोठे व्हावे व आपले करिअर उज्ज्वल करावे असे आवाहन केले.


श्याम चव्हाण जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या योजनांची माहिती करून घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकाने लाभ घ्यावा असे आवाहन केले. विजय केनवडेकर यांनी विद्यार्थ्यांना व समाज बांधवांना चर्मोद्योगा विषयी तसेच नवीन लेदर टेक्नॉलॉजीची माहिती दिली.
प्रमुख वक्ते प्रसाद मसुरकर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले शिक्षणातील कार्य, आरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.यावेळी सुजित जाधव,अनिल निरवडेकर,अजिंक्य पाताडे,कृष्णा पाताडे यांनी मनोगत व्यक्त केले.तालुकाध्यक्ष हरेश चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा महिला सदस्य शामल चव्हाण, जिल्हा सदस्य प्रसाद पाताडे, तालुका कोषाध्यक्ष विजय पाताडे, तालुका उपाध्यक्ष मधुकर कुणकवळेकर,माजी उपाध्यक्ष संतोष हिवाळेकर, सहसचिव काशिनाथ पाताडे, सहसचिव देवेंद्र चव्हाण, तालुका सदस्य संतोष मसुरकर, यशवंत चव्हाण, रमेश चव्हाण,सल्लागार हृदयनाथ चव्हाण , युवा तालुकाध्यक्ष मनोहर पाताडे
पेंडूर प्रभाग अध्यक्ष रमेश म्हापणकर ,
सुकाळवाड प्रभाग अध्यक्ष नितीन पाताडे ,
सचिव ललित पाताडे,
युवा प्रतिनिधी सुयोग पाताडे,
मसुरा गाव शाखाध्यक्ष संजय मसुरकर, आचरागाव शाखा अध्यक्ष सुंदर आचरेकर, कुंभारमाठ गाव शाखा अध्यक्ष दीपक माणगावकर, नांदोस कट्टा प्रभाग अध्यक्ष रुपेश चव्हाण, प्रभाग सचिव अजिंक्य चव्हाण, युवा प्रतिनिधी यश चव्हाण,
मालवण शहराध्यक्ष संजय भिलवडकर ,सचिव पद्माकर माणगावकर, मालवण तालुका महिला सदस्य गीतांजली चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव संभाजी कोरे यांनी,सूत्रसंचालन सुयोग धामापूरकर यांनी केले तर आभार अमित चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!