सावंतवाडी : चालत्या रुग्णवाहिकेने सातार्डा येथे अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज सायंकाळी सातार्डा- तिठा परिसरात घडली. रुग्णवाहिका ही गोवा- बांबुळी रुग्णालयाची असल्याचे समजते.
दरम्यान घटना घडल्यानंतर आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. त्यानंतर काही वेळाने त्या ठीकाणी आलेल्या पेडणे नगरपालिकेच्या बंबाने आग विझविण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली आहे.