Category बातम्या

केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त कणकवली कॉलेज कणकवली येथे सहकार रांगोळी स्पर्धा

कणकवली : शुक्रवार दिनांक ४ जुलै २०२५ रोजी केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त कणकवली कॉलेज कणकवली येथे सहकार रांगोळी स्पर्धा कणकवली कॉलेज कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक निबंधक श्री सुनील मरभळ यांनी विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रातील संधी…

केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त ‘सहकार रांगोळी स्पर्धा’

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग व आवळेगाव हायस्कूल यांचे आयोजन कुडाळ : गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 रोजी आवळेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे केंद्रीय सहकारीता मंत्रालय स्थापना वर्धापन दिनानिमित्त जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सिंधुदुर्ग व आवळेगाव हायस्कूल यांच्या संयुक्त…

एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून पाचव्या वर्षाची मान्यता

महाविद्यालयात नवीन १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश होणार सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील एसएसपीएम वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली यांचेकडून नुकतीच एमबीबीएस अभ्यासक्रमास पूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या वर्षासाठी आता नवीन १५० विद्याथ्यांचा प्रवेश महाविद्यालयात होणार आहे.…

प्राथमिक शाळा वेंगुर्ला क्र. 4 येथे आषाढी एकादशी निमित्त पायी वारी

वेंगुर्ला : प्राथमिक शाळा क्र. 4 मध्ये असलेल्या अंगणवाडी मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त आज सातेरी मंदिर ते वेंगुर्ला शाळा क्र.4 पर्यंत हि पायी वारी काढण्यात आली. यावेळी वेंगुर्ला शाळा क्र. 4 च्या मुख्याध्यापीका सौ. संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब,अंगणवाडी…

राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रामगड सरपंच शुभम मटकर यांची निवड राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांच्यामार्फत पंचायत प्रगती निर्देशांक २.० चे पुणे येथे ३ जुलै ते ५ जुलै पर्यंत ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित केले असून हे प्रशिक्षण ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग…

ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

बँकेच्या लिलावातील कार देतो अशी बतावणी करून फसवणूक कणकवली : बँकेच्या लिलावातील कार देतो अशी बतावणी करून एसबीआयचा अधिकाऱ्याने सेवानिवृत्त अभियंता असलेल्या एका ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक केली. रतनकुमार मनोज सावंत (74, मुळ रा. भिरवंडे, सध्या रा. मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार…

आकसापोटी केलेल्या कारवाई विरोधात तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी सुमित घाडीगावकर यांचे उपोषण

सावंतवाडी : प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सावंतवाडी प्रांत आणि तहसीदार यांच्याकडून आकसापोटी केलेल्या कारवाई विरोधात आंबोलीचे तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी सुमित घाडीगावकर यांनी उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अनिल पाटील, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या…

बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ या शाळेतील 200 गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्याना प्रत्येकी दिड डझन वहीचे वितरण

उद्योजक अनिलजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने कुडाळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सहकार्य सिंधुदुर्ग : बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ या शाळेचे शाळा समितीचे उपाध्यक्ष श्री.अनिलजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने 200 गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्याना प्रत्येकी दिड डझन वही ( 18 नग )वितरण…

तक्रार केल्याच्या रागातून एकाला मारहाण

कणकवली तालुक्यातील घटना झाडे तोडल्याची वनविभागाकडे केली होती तक्रार कणकवली : झाडे तोडली म्हणून वनविभागाकडे तक्रार केल्याचा राग आला. त्यामुळे बिडवाडी येथील मांगरवाडीतील शशिकांत लाड (वय ४८) यांना वसंत लाड (वय ५५) यांनी शिवीगाळ करत बांबूने मारहाण केली. त्याचप्रमाणे त्यांच्या…

गवा रेड्याच्या धडकेत युवक गंभीर

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : सावंतवाडी रेडी मार्गावरील माजगांव येथील कै. भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक गवा रस्त्यावर येऊन दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार सागर प्रभाकर मळगांवकर (३६, रा. मळगांव आंबेडकरनगर) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो जाग्यावरच पडून होता. त्यानंतर…

error: Content is protected !!