धोपेश्वर गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री. अरविंद लांजेकर यांचा अपक्ष अर्ज दाखल

राजापूर : धोपेश्वर पंचायत समिती गणातून राजापूर पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री. अरविंद लांजेकर यांनी आज मंगळवार, दि. २१जानेवारी २०२६ रोजी सकाळी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज त्यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडे सादर केला. अर्ज दाखल करताना धोपेश्वर पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आंबा व्यवसायातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. भगवान (शेठ) सावंत साहेब, रत्नागिरी जिल्ह्यातील केमिस्ट व्यवसायातील प्रसिद्ध व्यावसायिक श्री. प्रफुल लांजेकर, गोठणे-दोनिवडे येथील राजापूर तालुक्यातील व्यावसायिक श्री. अशफाक मापारी, पाचलचे श्री. समीर खानविलकर, श्री. मंगेश पांचाळ दोनिवडे, माजी सरपंच श्री. दीपक बेंद्रे आदींसह विविध गावांतील नागरिक उपस्थित होते. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

राजापूर शहरालगत असल्याने धोपेश्वर पंचायत समिती गणाकडे नेहमीच सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. या गणामध्ये सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्व असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत श्री. लांजेकर यांचे सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असून ते राणे कुटुंबीयांचे कट्टर व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच आमदार निलेश राणे यांचे विश्वासू सहकारी व आमदार किरण सामंत यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.

श्री. लांजेकर हे निर्भीड, बेधडक आक्रमकपणे आणि सर्वसामान्यासाठी निस्वार्थी, प्रामाणिकपणे , काम करणे, असा स्वभाव असलेले राजापूर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. तालुक्यातील टोलविरोधी आंदोलन, मोकाट गुरांचा प्रश्न, महामार्गावरील रखडलेली विकासकामे अशा विविध प्रश्नांवर त्यांनी ठाम भूमिका घेत आवाज उठवला असून अनेक कामे मार्गी लावली आहेत. प्रशासनाशी असलेल्या निकट संबंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कार्यालयातील रखडलेली कामे पूर्ण करून देण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.

कोंढेतड गावातील अंतर्गत हमरस्ते, पाणीपुरवठा व स्ट्रीट लाईटचे प्रश्न त्यांनी यशस्वीपणे सोडवले असून आता धोपेश्वर गणातील धोपेश्वर, गोवळ, शेढे, शीळ, कोदवली, गोठणे-दोनिवडे व चिखलगाव या गावांतील प्रत्येक वाडी-वस्तीवर स्ट्रीट लाईट बसविण्याचा त्यांचा संकल्प आहे. तसेच धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण व सुशोभीकरण, राजापूर–शीळ–चिखलगाव मार्गे सौंदळकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणाची मागणी त्यांनी आमदार, पालकमंत्री व खासदार यांच्याकडे केली आहे.

अपघातग्रस्तांना तातडीची मदत, निराधार कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे, तसेच हिंदू-मुस्लिम सर्व धर्मीयांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही त्यांची ओळख आहे. अशा सामाजिक कार्याच्या जोरावर श्री. अरविंद लांजेकर यांची उमेदवारी धोपेश्वर गणात चर्चेचा विषय ठरत असून येणाऱ्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!