Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

टायर फुटून वीज वाहतूक करणारा टेम्पो पलटी

दोन कामगार जखमी; वैभववाडी तालुक्यातील घटना वैभववाडी : खारेपाटण -कोल्हापुर मार्गावर तिथवली – नाऊळदेवाडी येथे वीज खांब वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा टायर फुटून अपघात झाला. यात दोन कामगार जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बारामती…

जिल्हा रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

१० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (५६) यांना एका तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. वैद्यकीय उपचारांचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ही…

जमिनीत जाण्याच्या वाटेवरून वृद्धाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण

वेंगुर्ले परबवाडा येथील घटना वेंगुर्ले : परबवाडा येथील ७९ वर्षीय वृद्ध अरुण गणपत भोवर यांना जमिनीत जाण्याच्या वाटेवरून झालेल्या वादातून दोघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना ९ मे रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली असून, याप्रकरणी भोवर यांनी…

गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्रमंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 चे भव्य दिव्य उद्घाटन.

कुडाळ : गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्र मंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 भव्य दिव्य खुल्या अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनपिंगुळी गावचे सरपंच श्री.अजय आकेरकर, प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राची लाडकी…

साफसफाई करताना विजेचा धक्का लागून जुळे भाऊ गंभीर जखमी

खारेपाटण येथील घटना खारेपाटण : तालुक्यातील खारेपाटण येथे घराची साफसफाई करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून दोन सख्खे जुळे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. प्रसाद प्रमोद राणे (३९) आणि सिद्धेश प्रमोद राणे (३९) अशी या जखमी भावंडांची नावे असून, ते…

शौचालयाच्या टाकीत पडून वृद्धेचा मृत्यू

झाराप वराडकर वाडी येथील घटना कुडाळ : झाराप – वराडकर वाडी येथील सुवर्णा सुरेश मांजरेकर (वय ६५) यांचा आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. घराजवळ असलेल्या शौचालयाच्या टाकीची फरशी अचानक फुटल्याने त्या थेट टाकीत कोसळल्या. या दुर्घटनेत…

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स, हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शिक्षण व ग्रामीण विकासाचा सूर

“ग्रामीण भागातील शाळा टिकविण्यासाठी समाजाने पुढे यावे” ; माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन कणकवली : ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत.…

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या

मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या ; मंत्री नितेश राणे मुंबई : कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा,…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे आदेश जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा कलंबिस्त : कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे…

error: Content is protected !!