Sindhudarpan

Sindhudarpan

जिल्ह्यात आजपासून २२ डिसेंबर पर्यंत मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्ह्यात उद्यापासून २२ डिसेंबर पर्यंतमनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला होत असलेला विलंब व ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय पक्षात होत असलेला विरोध,…

लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार?

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली तारीख मुंबई प्रतिनिधी: भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. ते…

पिंगुळीत 25 डिसेंबर पासून पिंगुळी महोत्सव 2024 चे आयोजन

मिस पिंगुळी, लोकनृत्य सह विविध स्पर्धांचे आयोजन विविध स्टॉल्स आणि आरोग्य शिबीर कुडाळ प्रतिनिधी: श्री देव रवळनाथ पंचायतन यांच्या आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री राऊळ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंगुळी गावात दिनांक 25, 26, 27 डिसेंबर 2024 रोजी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली “विमा सखी” योजनेची घोषणा

मुंबई प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी हरयाणातून विमा सखी योजना लॉन्च केली आहे. या योजनेचा उद्देश देशातील अर्ध्या जनतेला म्हणजेच महिलांना आर्थिक स्वरुपात सशक्त आणि आत्मनिर्भर करणं आहे. या योजनेचा भाग होणाऱ्या महिलांना ‘विमा…

नवीन वर्षात कोकण रेल्वेकडून प्रवशांसाठी खास गिफ्ट

अहमदाबाद-थिवि विशेष रेल्वेगाडी सुरू कुडाळ प्रतिनिधी : लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गाकरून विशेष अहमदाबाद-थिवि अशी द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येत आहे.ही विशेष रेल्वेगाडी 8 डिसेंबर ते 1 जानेकारी 2025 या कालावधीत…

वेंगुर्ला येथे उद्या आंबा लागवड कार्यशाळेचे आयोजन

वेंगुर्ले प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ शिरोडा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सिंधुदुर्ग यांच्यावतीने मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे अति घन आंबा लागवड व निर्यात आंबा लागवड याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे…

बिहारच्या राज्यपालांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे दर्शन

वेंगुर्ले प्रतिनिधी: बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज सपत्नीक कोकणचा तिरुपती म्हणून ओळख असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबा, वैष्णोदेवी सातेरीचे दर्शन घेतले. राज्यपाल श्री. आर्लेकर हे मूळ आरवली येथील रहिवासी आहेत. मात्र त्यांचे वास्तव्य गोवा राज्यात असते.…

बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा सिंधुदुर्ग शिवसेनेने केला निषेध

वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर,सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथे केले आंदोलन सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी: बांग्लादेशामध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत असून त्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी-२०२४ संकलन शुभारंभ कार्यक्रम

सशस्त्र दल निधीत आपले योगदान देऊन कर्तव्याचे पालन करुया जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाचे संरक्षण केले आहे. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे…

सकल हिंदू समाज सिंधुदुर्गचे बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

ब्युरो न्यूज: बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित जिहादी अत्याचार थांबावेत यासाठी सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांनी जागतिक मानवाधिकार दिन 10 डिसेंबर 2024, सकाळी 10 वा. छ. शिवाजी महाराज चौक, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने…