नाराज राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?

आज थेट पत्रकारांशी संवाद मात्र पक्ष प्रवेशाबद्दल मौन

रत्नागिरी: शिवसेनेत अनेकजण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात शुक्रवारी रत्नागिरीमधून होत आहे. रत्नागिरीतील माजी आमदार उद्या प्रवेश करणार आहेत. तसेच राज्यातले 10 माजी आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यातील काहीजण हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत. या दोन ते तीन महिन्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे अनेक नेते एकनाथ शिंदेचं नेत्रुत्व स्वीकारतील. याची सुरुवात ही माजी आमदारांपासून होणार आहे. असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.दरम्यान मंत्री सामंत यांच्या दाव्यानुसार, राजन साळवी हे शुक्रवारी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली मात्र आज नाराज माजी आमदार राजन साळवी यांनी थेट पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांना पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना पक्ष प्रवेशाच्या बातम्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येक पक्ष मजबूत कसा होईल याकडे लक्ष देत आहे.मी माझा मतदार संघ कसा मजबूत होईल याकडे लक्ष देणार आहे. अस म्हणाले आहेत.

आपला मतदार संघ मजबूत करण्यासाठी आपले प्रयत्न. असल्याचे नाराज माजी आमदार राजन साळवी यावेळी म्हणाले आहेत. राजन साळवी मतदार संघ मजबूत करण्यासाठी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत का? की उबाठा मधेच कायम राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!