रोणापाल येथील शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा केले 25 दिवसापासून बंद ग्रामस्थ आक्रमक

बांदा : गाव मौजे रोणापाल येथील विद्युत पुरवठा गेले पंचवीस दिवस खंडित असून वारंवार या संदर्भात महावितरण बांदा शाखा २ कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांना वारंवार या संदर्भात कळविले आहे परंतु विद्युत पुरवठा सुरळीत करायला दिरंगाई करत आहेत. या भागाचे वायरमन उमेश कोरगावकर यांनी विद्युत वाहिन्या त्या ठिकाणी तुटलेल्या बाजूला करून ठेवलेले आहेत परंतु या संदर्भात विचारणे केले असता आज करतो ,उद्या करतो असे थातूरमातूर उत्तर या ठिकाणी वायरमन देत आहे अशी टीका शेतकरी राजेश मयेकर यांनी केली आहे. तसेच या भागातील शेतकरी नारायण आजगावकर, सुनील नाईक, प्रसाद सावंत आदींचा विद्युत पुरवठा बंद आहे. शेतीचं गेल्या आठ दिवस सतत पाऊस न पडल्यामुळे नुकसान झाले आहे या संदर्भात उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडूनही उत्तर मिळत नाही त्यामुळे जर विद्युत पुरवठा सुरळीत केला नाही तर बांदा कनिष्ठ अभियंता २ यांच्या कार्यालयात ठाण मांडून बसणार असं शेतकरी राजेश मयेकर यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

error: Content is protected !!