कोल्हापूर-पणजी वाहतूक गोंधळावर खाजगी वाहन चालकाचा हस्तक्षेप
चुनवरे पोईप गावचे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री.रुपेश परब यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या मदतीने ठेकेदाराला आणले वठणीवर.
मालवण : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सध्या संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडी आणि गोंधळाचे वातावरण आहे.मुंबई गोवा महामार्गावर युद्धपातळीवर काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग म्हणून पाली- कोल्हापूर- असा मार्ग बदल करुनही वाहनांचा खेळ खंडोबा निर्माण झाला. अनेक वाहन चालकांना दिशादर्शक फलक नसल्याने रस्ता चूकून ७० ते ८० किलोमीटर दुर पर्यंत नाहक जावे लागले. पावसाची ही यामध्ये आणखी भर पडली होती. ती कोल्हापूर-पणजी मार्गावर दिशादर्शक फलक न लावल्यामुळे अनेक वाहन चालकांचा गोंधळ उडाला होता.त्यामुळे अनेक वाहनचालक चुकीच्या मार्गाने जात असून अपघाताचा धोका वाढला आहे.
यावेळी खाजगी वाहन चालक आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे रुपेश परब आणि निलेश परब यांनी प्रसंगावधान राखत थेट रस्ते विकास प्रकल्पाच्या ठेकेदारांशी संपर्क साधला आणि त्यांना योग्य सूचना दिल्या. अपुऱ्या फलकांमुळे सामान्य नागरिकांची होणारी गैरसोय, तसेच अपघाताची शक्यता याबद्दल त्यांनी ठेकेदाराचे लक्ष वेधले. माजी आमदार वैभव नाईक यांनी याबाबत विशेष लक्ष घातले. निलेश परब यांच्या या ठाम भूमिकेमुळे संबंधित ठेकेदाराने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच योग्य दिशादर्शक फलक लावले जातील, अशी माहिती दिली होती .आज तो दिशादर्शक फलक फलक लावण्यात आला आहे.
माजी आमदार वैभवजी नाईक यांनी शिवसेना स्टाईलने ठेकेदाराला वठणीवर आणले. स्थानिक लोकांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याचे आणि आवाज उचलणाऱ्या तरुणांचे कौतुक केले असून, प्रशासनानेही याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.