शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
मालवण : धामापूर मोगरणे येथे जयंत सदानंद ठोंबरे यांच्या घराच्या बाजूला काही दिवसांपूर्वी दरड कोसळून पडवीचे मोठे नुकसान झाले होते. पडवीत बांधलेली गाय गंभीर जखमी झाली. घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान शिवसेना उप. जिल्हाप्रमुख श्री. विश्वास गांवकर, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, शिवसेना युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर यांनी घटनास्थळी पाहाणी केली. नुकसानीची माहिती घेतली.