२० जूनपर्यंत आयुक्तांसोबत बैठक लावा अन्यथा २१ जून रोजी ठिय्या आंदोलन छेडू
वैभव नाईक,परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत, सुशांत नाईक यांचा महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना इशारा
       शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धडक देत  कंत्राटी कमर्चाऱ्यांच्या पगाराच्या पैशात केला जाणारा भ्रष्टचार उघडकीस आणला आहे.रुग्णांना योग्य सेवा या रुग्णालयातुन मिळत नाही. दिवसाला फक्त ५० ओपीडी होते. आरोग्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन गांभीर्याने घेत नाही त्यामुळे या सर्व विषयांसंदर्भात २० जून पर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सिंधुदुर्गात बोलावून बैठक लावा अन्यथा  २१ जून रोजी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे यांना दिला आहे.
       सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने तांत्रिक व शिपाई, सफाई कामगार (वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’) ची  २३० पदे भरण्यात आलेली आहेत. मात्र भरती केलेले  कर्मचारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळून येत असून हे कर्मचारी आपल्या कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतात  प्रत्यक्षात हजेरी पाहिली असता १५० कर्मचारी कामावर हजर असतात. मात्र महिन्याला ५७ लाख रुपये ठेकेदाराला पगार पडतो परंतु प्रत्यक्षात कामावर असलेल्या  कर्मचाऱ्यांना मात्र तुटपुंजा पगार दिला जातो.त्यामुळे ठेकेदारामार्फत कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे काढण्यासाठीच आणि भ्रष्टाचार करण्यासाठीच हि बोगस कंत्राटी कर्मचारी भरती करण्यात आली आहे का असा सवाल करत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनंत दवंगे यांना धारेवर धरले. असुविधांबाबत जाब विचारला.
           जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात समन्वय नसल्याने  रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयात अनेक युनिट बंद आहेत कोरोना काळात तीस बेड होते आज एकही बेड दिसत नाही, प्रत्यक्षात कर्मचारी मस्टरवर असतानाही कामावर हजर नाही अनेक कर्मचारी बाहेर फिरतात. उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या खोट्या सह्या करून घेतल्या जात आहेत. असा आरोप करत उपस्थित कर्मचारी दाखविण्यास शिवसेना शिष्टमंडळाने भाग पाडले. मस्टरवर साफसफाईचे स्वतंत्र कर्मचारी असूनही  परिचर स्टाफलाही साफसफाई करावी लागते कर्मचाऱ्यांना वेठबिगारी सारखे काम करून न घेता त्यांना ज्यासाठी नेमले तेच काम त्यांच्याकडून करून घ्या प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य तो पगार द्या ठेकेदाराचा फायदा पाहू नका आणि या सर्व प्रश्नांवर  येत्या २० जूनपर्यंत आयुक्तांशी बैठक न घेतल्यास २१ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया समोर आणि अधिष्ठाता कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जी. प सदस्य राजू कविटकर, श्री. सावंत महाविद्यालयाचे कक्ष अधीक्षक जोगळेकर व अन्य शासकीय कर्मचारी उपस्थित होते.1
 / 
67


आणि राजन तेली खळखळून हसले...  #sindhudurg #rajanteli #nileshrane

उद्या वैभव नाईक जरी पक्षात येत असतील तरी त्यांचे स्वागत करा #nileshrane #vaibhavnaik #rajanteli

बीजेपीमध्ये जे आहेत ते सगळे माझेच सहकारी आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #deepakkesarkar

निलेश राणे उभे आहेत ना १०० % मी निवडून येणार Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik #sindhudurg

कापा म्हणजे ? मर्डर करा ? एवढं सोपं आहे का ? निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #sindhudurg #kudal

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी  ACB कटिबद्ध #sindhudurg #acb

तुझ्या औकातीत रहा संजू परब यांचा विशाल परबांना थेट इशारा #sawantawadi #vishalparab #sanjuparab

खोटया गुन्हयात अडकवले वकीलांचा पोलिसांवर आरोप #sindhudurg #kudal #breakingnews

रणझुंजार मित्रमंडळ नेरूर व रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नरकासुर स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल #sindhudurg #kudal

तेर्से बांबर्डे मळावाडी येथील ब्रिजचे काम शंभर टक्के पूर्ण करणार- निलेश राणे Nilesh Rane #nileshrane

कोणी कोणाला काढलं तेच समजत नाही ! #rajthackeray
1
 / 
67

 
	

 Subscribe
Subscribe









