आमचा विजय निश्चित
अनंत पिळणकर आणि कीर्ती एकावडे यांचा पियाळी गावात प्रचाराचा धडाका
मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी)
सत्ताधारी फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात विकास करण्यासाठी अपयशी ठरले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे.विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी पियाळीवासीयांनी आम्हा दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा.असे आवाहन महाविकास आघाडीचे फोंडा जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी केले. आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सत्ताधाऱ्यांबद्दल मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.हिच नाराजी विजयात रुपांतर करेल असा विश्वास पिळणकर यांनी व्यक्त केला.
लोरे पंचायत समिती मध्ये पियाळी गावांमध्ये फोंडा जि.प.चे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अनंत पिळणकर व लोरे पंचायत समितीचे उमेदवार सौ कीर्ती कृष्णा एकावडे यांचा पियाळी गावामध्ये घरोघरी प्रचार सुरु असून प्रचाराचा धडाका जोरात सुरु असून अनंत पिळणकर यांना व पंचायत समितीचे उमेदवार कीर्ति एकावडे या दोन्ही उमेदवारांना या दोन्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पियाळी वाशी यांचा आशीर्वाद घेतला.
यावेळी उपस्थित, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला विभागाच्या तालुका प्रमुख माधवी दळवी, उपतालुकाप्रमुख संजना कोलते, या सिद्धेश राणे, शाखाप्रमुख निलेश राणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे फोंडा विभाग प्रमुख रमेश राणे, प्रकाश उर्फ बबन नारकर, प्रवीण गुरव, संजय बंदरकर, घोणसरीचे माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरीचे ग्रामपंचायतचे सदस्य सचिन मेस्त्री, प्रकाश मडवी, विशाल राणे, प्रीतम राणे, गौरव एकावडे आदी उपस्थित होते.


Subscribe









