कुडाळ : शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले तर बघ, अशी धमकी दिल्या प्रकरणी प्रमोद विजय माटवकर (वय ३५, सध्या राहणार हिंदू कॉलनी, मूळ रा पोहरे मशीवीवाडी ता. देवगड) यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 63 (अ) (ड), 64, 75(1)(i)(ii), 78(1), 332(ब), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित संशयिताला २ मे २०२५ रोजी अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कस्टडी देण्यात आली. सध्या संशयित न्यायालयीन कस्टडीत आहे कुडाळ तालुक्यातील २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिल्यावरून पोलिसांनी संशयताच्या विरोधात कारवाई केली. हा गुन्हा एका खाजगी आस्थापनेत आणि एका गृहनिर्माण सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये जानेवारी २०२५ ते कारवाई केली. हा गुन्हा एका खाजगी आस्थापनेत आणि एका गृहनिर्माण सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये जानेवारी २०२५ ते १८ एप्रिल २०२५ या कालावधित घडला घडलं.२ मे रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रमोद माटवकर हा फिर्यादीशी वेळोवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून ती एकटी असताना तिचेवर अश्लील टिप्पणी करून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. तसेच त्याने वेळोवेळी फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहा वाजता आरोपीने फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटवर जाऊन तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर कोणाला सांगितले तर ठार मारल्याची धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे.